भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये कुत्र्यासारख भुंकायला लावून एका हिंदू तरुणाला मुस्लिम होण्यासाठी दबाव टाकण्यात आला. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने त्याच्याकडून अनेकवेळा पैसे उकळले. या घटनेतील सर्व ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पीडित तरुण हा भोपाळच्या लालघाटी येथील पंचवटी कॉलनी येथील रहिवासी आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ 9 मे 2023 चा आहे. पीडित तरुणाने सांगितले की, 9 मे रोजी रात्री एका लग्नात सहभागी झाल्यानंतर त्याने सर्वप्रथम त्याचा मित्र शाहरुखला त्याच्या घरी सोडले. यानंतर तो घराकडे जाऊ लागला असता समीर, फैजान व अन्य एक आरोपी दुचाकीवरून तेथे आले. त्यांच्या स्कूटीच्या चाव्या, मोबाईल आणि पैसे हिसकावून घेतले. यानंतर तिघेही त्याच्याशी भांडू लागले.यानंतर समीर आणि फैजानने त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पीजीबीटी कॉलेज ग्राउंडवर नेले. येथे त्यांनी मुफिद, साहिल आणि बिलाल यांनाही बोलावले. यानंतर आरोपीने त्यांच्या गळ्यात पट्टा घालून त्याला बेदम मारहाण केली आणि कुत्र्यासारखे भुंकण्यास भाग पाडले. तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकला.
पीडित तरुणाने सांगितले की, आरोपीने त्याच्याकडे मोठ्या भावाचा नंबर मागितला होता. त्याला बोलावून शिवीगाळही केली. रात्री अडीचच्या सुमारास आरोपींनी त्याला सोडून दिले आणि स्कूटीच्या चाव्या परत केल्या. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी तो पोलिसांकडे तक्रार घेऊन गेल्याचेही पीडितेचे म्हणणे आहे. पण या प्रकरणी पोलीसांनी त्यांच्याकडे पुरावा मागितला.
या घटनेनंतर आरोपी 40 दिवस पीडित तरुणावर अत्याचार करत होते. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैसे उकळायचे. पीडित तरुणाने आतापर्यत 10 हजार रुपये आरोपीना दिला आहेत. धमक्या देऊनही आणि ब्लॅकमेलिंग थांबले नाही, तर त्याने 18 जून 2023 च्या रात्री स्वतः हा व्हिडिओ व्हायरल केला.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. आरोपींवर एनएसए लावण्यात आले आहे. तसेच आरोपीच्या घरावर बुलडोझरही चालवण्यात आला आहे.
सविस्तर वाचा