इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचे आयआयटी बॉम्बेला ३१५ कोटींचे दान

    20-Jun-2023
Total Views |
Infosys Co Founder nandan Nilekani

मुंबई
: आयटी जगतातील आशियातील सर्वोत्तम कंपन्यांपैकी एक असलेली इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांनी तब्बल ३१५ कोटींचे दान केले आहे. आयआयटी बॉम्बेचे विद्यार्थी राहिलेले नंदन यांनी या संदर्भात एक निवेदन सादर केले आहे. ही रक्कम त्यांनी आपल्या कारकीर्दीत महत्तावाचा भाग असलेल्या आयआयटी बॉम्बेला दान केले आहेत. त्यांनी दान करतानाच आपल्या भावना व्यक्त केल्या असून आयआयटी बॉम्बे आपल्या करियरमध्ये महत्त्वाचा भाग आहे. गेली ५० वर्षे आपण या संस्थेसोबत जोडलेले आहोत असेही ते यावेळी म्हणाले.


त्याचप्रमाणे, आयआयटी बॉम्बेमधून शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी उद्याचे भविष्य असून त्यांना दर्जेदार शिक्षण व सोयी सुविधा मिळाव्यात. तसेच, हे दान कुठल्याही आर्थिक मदतीपेक्षा खूप मोठे असून येणाऱ्या भविष्याकरता आपण मोठे दान देत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. ज्या संस्थेने आपल्याला इतकं अमाप यश मिळवून दिलं त्या संस्थेचा आपण एक भाग आहोत याचा आनंद असल्याचा ते म्हणाले.