कट्टरपंथींनी तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधून कुत्र्यासारख भुंकायला लावलं!

    19-Jun-2023
Total Views |
bhopal-viral-video-youth-tied-like-dog-harassed-narottam-mishra-ordered-probe
 

भोपाळ : मध्य प्रदेशमधील भोपाळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये काही कट्टरपंथींनी एका हिंदू तरुणाच्या गळयात पट्टा घातला आहे. तसेच ते ते कट्टरपंथी त्या हिंदू तरुणाला कुत्र्यासारखे भुंकायला सांगत. व्हिडिओमध्ये पीडित तरुण माफी मागताना आणि मियाँ बनण्याबाबत बोलताना दिसत आहे. धर्मांतरणासाठी आरोपी पीडित तरुणावर दबाब आणत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आता पर्यत 3 आरोपीना अटक करण्यात आले आहे.


हे प्रकरण भोपाळ टिला जमालपुरा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. बिलाल टीला, फैजान लाला, मोहम्मद समीर टीला, साहिल बच्चा आणि मुफिद खान अशी आरोपींची नावे आहेत.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपींनी तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधला आहे. पीडित मुलगा गुडघ्यावर बसलेला दिसतोय.

याची दखल घेत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याप्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, “मी तो व्हिडिओ पाहिला आहे. खूप गंभीर वाटत होते. कोणत्याही माणसाशी असा गैरवर्तन करणे निंदनीय आहे. मी भोपाळच्या पोलीस आयुक्तांना याची चौकशी करून सत्य शोधून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे.