राष्ट्रीय वाचन दिनाच्या शुभेच्छा!

    19-Jun-2023
Total Views |
National Reading Day

नवी दिल्ली
: पी. एन. पणिक्कर यांचा १९ जून १९९५ रोजी केरळमध्ये निधन झाले. त्यांना केरळमधील ग्रंथालय चळवळीचे जनक म्हटले जाते. आपल्या गावी एक शिक्षक म्हणून, पणिक्कर यांनी १९२६ मध्ये सदनाधर्मम ग्रंथालय सुरू केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात 'राष्ट्रीय वाचन दिवस' साजरा केला जातो.

पी. एन.पणिक्कर कोण होते?

पणिकर यांचा जन्म १ मार्च १९०९ रोजी झाला. ते शिक्षक होते. त्यांचा समाजावर मोठा प्रभाव होता. 1945 मध्ये 47 ग्रामीण ग्रंथालयांसह तिरुविठमकूर ग्रंथशाळा संघम (त्रावणकोर लायब्ररी असोसिएशन) ची स्थापना करण्यात आली. ग्रंथालय स्थापनेच्या मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केले. 'पढ़ो और बढ़ो' असे संघटनेचे घोषवाक्य होते. पुढे केरळ राज्याच्या निर्मितीनंतर या संघटनेचे नाव केरळ ग्रंथशाळा संघम झाले. केरळमध्ये गावोगावी फिरून त्यांनी लोकांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. अशा प्रकारे त्याच्या नेटवर्कमध्ये ६ हजार पैक्षा जास्त लायब्ररी त्यांनी जोडल्या. १९७५ मध्ये त्यांच्या ग्रंथालयाला कृपसकय अवॉर्ड देण्यात आला. पणिकर हे ३२ वर्षे संघाचे सरचिटणीस होते. नंतर सरकारने ती संस्था आपल्या ताब्यात घेतली. नंतर त्याचे केरळ राज्य ग्रंथालय परिषद असे नामकरण करण्यात आले. कमेंटकरून कळवा तुम्ही कोणत पुस्तक वाचताय?