मुंब्र्यानंतर संगमनेरमध्ये गेम जिहाद!

    17-Jun-2023
Total Views |
 
Sangamner
 
संगमनेर : मुंब्र्यानंतर आता संगमनेरमध्ये गेम जिहाद समोर आला आहे. पब्जी गेमच्या माध्यमातून अहमदनगरच्या संगमनेरात एका गावातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेर पोलिसांनी याप्रकरणी एका अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.
 
अक्रम शाहाबुद्दिन शेख असे आरोपीचे नाव असल्याचे समजते आहे. संगमनेर पोलिसांनी अक्रम शेखला अटक केली आहे. संगमनेर इथल्या एका २२ वर्षीय पीडित तरुणीशी पब्जी बिजीएमआय गेमच्या माध्यमातून आरोपी अक्रम शाहाबुद्दिन शेखने ओळख केली होती. हा आरोपी मूळचा अलीनगर जिल्हा दरभंगा बिहार येथील आहे. अक्रमसोबत त्याचा एक मित्र नेमितुल्ला हादेखील थेट बिहारहून संगमनेरात आला होता. उत्तर प्रदेशमध्ये ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुलींना फसवण्याचा प्रकार समोर आल्यानंतर संगमनेर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.