पुणे : "अल्ला देवे अल्ला खिलावे अल्ला पिलावे, अल्ला बिगर ना कोई, अल्ला करे सो होई!", असं म्हणत वारकऱ्यांची दिशाभूल करण्याचा धक्कादायक प्रकार वारीत उघडकीस आला आहे. सध्या सुरू असलेल्या दिंड्यांच्या माध्यमातून धर्मांतरण करण्याचा कट तर नाही ना, असा संशय आता व्यक्त केला जात आहे. एक व्यक्ती "अल्ला देवे अल्ला खिलावे अल्ला पिलावे, अल्ला बिगर ना कोई, अल्ला करे सो होई!", असे म्हणत वारकऱ्यांना अभंगाच्या चालीत गाणं म्हणायला लावतो. शेवटी संत तुकाराम महाराजांचे नाव घेतो. मात्र, ज्यावेळी आजूबाजूचे १० ते १५ वारकरी विठ्ठलाचे नाव घेतात त्यावेळेस कानाडोळा करुन काढता पाय घेत असल्याचे या व्हीडिओतून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी हिंदूत्ववादी संघटनांतर्फे तीव्र प्रतिक्रीया येत आहेत. सामाजिक सलोख्याच्या नावाखाली हे असे प्रकार वारीत खपवून घेतले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. लेखिका शेफाली वैद्य आणि लेखक तुषार दामगुडेंनीही सोशल मीडियावर पोस्ट करत याचा निषेध नोंदविला आहे. ते म्हणतात, "भारत हा हिंदू बहुसंख्य असलेला, पण तरीही धर्मनिरपेक्ष असलेला देश आहे असे आपण सर्वच जण नागरिकशास्त्रात शिकलोय, पण आपली ही धर्मनिरपेक्षता म्हणजे नक्की काय? भारत ह्या हिंदू बहुल देशात कुठल्याही जुन्या मशिदीखाली खोदलं तर जुन्या मंदिरांचे अवशेष सापडतील परंतु मंदिराखाली कधी उध्वस्त केलेली मशीद सापडत नाही.
भारत या हिंदू बहुल देशात हिंदूंमध्ये हमीद दाभोळकर सापडतो पण मुसलमानांमध्ये कुणी नरेंद्र शेख सापडत नाही. या देशातल्या हिंदूबहुल महाराष्ट्रात औरंगजेबाची थाटामाटात राखलेली कबर सापडते परंतु याच देशातल्या मुस्लिमबहुल काश्मीरमध्ये संभाजी महाराजांची साधी तसबीर देखील सापडणार नाही. भारत ह्या हिंदूबहुल देशात श्री तुळजाभवानी नावाचे ’हलाल मटणाचे दुकान सापडते, पण ताज मटण हाऊस नावाच्या दुकानात झटका मटण तुम्हाला कधीच मिळणार नाही.
भारत ह्या हिंदूबहुल देशात हिंदूंच्या वारीत कोणी मुसलमान मुल्ला येऊन ’अल्ला देवे, अल्ला खावे’ असले अभंग ऐटीत म्हणतो आणि मागे हिंदू वारकरी ताल धरतात, पण कधी कुठल्या दर्ग्यात किंवा मुहर्रर्रमच्या ताजियात ’तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हा अभंग लावलेला ऐकलाय का कुणी? भारत या हिंदूबहुल देशात अल्पसंख्य असलेले सरकारी अनुदान घेऊन निर्धास्तपणे मक्का मदीनेची वारी करायला जातात परंतु याच देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या तिर्थक्षेत्रांवर दहशतवादी हल्ल्यापासून बचावासाठी लष्कर तैनात करावे लागते.
भारत ह्या हिंदूबहुल देशात कुठल्या कोण ब्रह्मदेशातल्या रोहिंग्यांसाठी आणि इस्राएल मधल्या गाझापट्टीतल्या मुसलमानांसाठी भव्य मोर्चे काढले जातात, त्या मोर्चांमधले लोक पोलिसांच्या गाड्या पेटवून देतात, स्त्री पोलिसांच्या अंगावर हात टाकतात, हुतात्मा स्मारकाला लाथा घालतात, सर तनसेजुदा करायच्या उघड घोषणा देतात, त्यांना काहीही होत नाही, पण हिंदूनी दिलेली #जयश्रीराम ही घोषणा कम्युनल ठरते. हीच ती भारत ह्या हिंदूबहुल देशात गेली पंचाहत्तर वर्षे जाणीवपूर्वक रुजवलेली, वाढवलेली ढोंगी-दगाबाज धर्मनिरपेक्षता आहे.", अशी प्रतिक्रीया त्यांनी या घटनेवर दिली आहे.