मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय यांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांना सेशन्स कोर्टाने नाकारले असून एकप्रकारे कंबोज यांच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. स्वतः मोहित कंबोज यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोर्टाने पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला क्लोजर स्वीकारला असुम माझ्याविरुद्धची कारवाई बंद केली आहे, असे मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.
बँक ऑफ इंडियाने कंबोज यांच्यावर आर्थिक व्यवहारांवरून आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी करत कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, या आरोपांना सिव्हिल अँड सेशन्स कोर्टाने नाकारले असून त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेत असताना मोहित कंबोज विरुद्ध मविआ यांच्यात कायम संघर्ष झाल्याच्या घटना महाराष्ट्राने पाहिल्या होत्या. त्यांच्यावर विविध प्रकारचे आर्थिक अफरताफरीचे गुन्हेही मविआच्याच काळात दाखल करण्यात आले होते. त्यातील या महत्वपूर्ण प्रकरणांमधून कंबोज यांना निर्दोष ठरविण्यात आले आहे.
"CBI च्या प्रामाणिक आणि सद्गुणी अधिकार्यांचा विश्वास, संयम आणि सहकार्य यामुळे सर्व खटल्यातून माझी मुक्तता झाली आहे. आपल्या महान देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि तपास यंत्रणांवर माझा विश्वास दृढ आहे आणि खोटे आणि फालतू आरोप न्याय आणि सत्याच्या वेदीपुढे नेहमीच गुडघे टेकतात याची आज प्रचिती आली. माझ्या हितचिंतकांचे मनापासून आभार !"
-मोहित कंबोज, नेते, भाजप