पुणे : फेसबुक पेजवर हिंदूधर्म विषयी आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या पेजवर अंगावर भगवी वस्त्र परिधान केलेल्या अर्ध नग्न महिलेचा अश्लील हावभाव करीत असलेला व्हिडिओ टाकून त्याच्यामागे भगवान श्रीरामांसंबंधीचे गीत टाकून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला होता. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे.
दरम्यान, शकील सलीम तांबोळी (वय ३८, रा. नाना पेठ) असे आरोपीचे नाव असून त्याने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार जितेंद्र दत्तात्रय पवार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र पवार हे समर्थ पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीस आहेत. ते गोपनीय विभागामध्ये काम करतात. ते पालखी विठोबा मंदिर, नाना पेठ या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान बंदोबस्तासाठी हजर होते. त्यावेळी काही तरुणांनी त्यांना शकील तांबोळी याने त्याच्या फेसबुक अकाउंटवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या माहिती दिली. पवार यांनी शकील तांबोळी याच्या फेसबुक पेजवर जाऊन त्याची खात्री केली.
त्याचबरोबर, पेजवर 'ठणाठण धर्म युगे युगे, जय चिली लाम, ये तो अभी झाकी है हिंदूटठराष्ट्र बनना बाकी है, जय चिली लाम' असा मुस्कुर टाकला होता. अंगावर भगवी वस्त्र आणि भगव्या फुलांच्या माळा परिधान केलेली अर्ध नग्नावस्थेत असलेल्या महिलेचा अश्लील हावभाव करतानाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओच्या मागे ' कर दो जा के ये ऐलान, भगवा रंग मेरी पहचान, हम हिंदू जगाने आये है, हम हिंदू जगा के जायेंगे, मरते दम तक अपने मुखसे जय श्रीराम गायेंगे, चमक रही तलवारे सबकी चमक रहा त्रिशूल है, हिंदू को कमजोर ना समझो ल, ये दुश्मन की ललकार है' हे गाणे टाकण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी हे अकाउंट शकील चालवणाऱ्या शकील तांबोळी याचा शोध घेतला आणि त्याला बेड्या ठोकल्या आहेत.