मुंबई : "कबाली" या चित्रपटाचे निर्माते के. पी. चौधरी यांना ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तेलंगणातील हैदराबाद पोलीसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत हैदराबाद पोलीसांना निर्माते के. पी. चौधरी हे कोकेन विकत असल्याचे पुढे आले आहे. चौधरी यांच्यावर ड्रग्जची विक्री केल्याचा आरोप करत पोलीसांच्या विशेष पथकाने त्यांना ड्रग्ज विकताना रंगेहाथ पकडले आहे. जवळपास ८२.७५ ग्रॅम कोकेन या कारवाईत जप्त करण्यात आले असून २.५ लाखांची रोकड त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, अभिनेते रजनीकांत यांच्या ‘कबाली’ या चित्रपटाची तेलुगू आवृत्ती रिलीज करणारे तेलगू निर्माते केपी चौधरी यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. सायबराबाद पोलिसांनी दि. १३ जून रोजी त्याच्याकडे कोकेनचा मोठा साठा सापडल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. तसेच, हैदराबादमधील राजेंद्र नगर येथील राहत्या घराजवळील आपल्या ग्राहकांना ड्रग्ज पुरवण्यासाठी जात असताना चौधरींना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून ८२.७५ ग्रॅम वजनाच्या कोकेनच्या ९० पॅकेट्स जप्त करण्यात आले. तपासादरम्यान, त्याने नुकतेच गोव्यातून कोकेनच्या १०० पॅकेट्स आणल्याचे निष्पन्न झाले.