कुठल्याही जाहिरातीमुळे वाद होईल इतकं तकलादू सरकार आमचं नाही!

- जाहिरात वादावर फडणवीसांची पहिलीच प्रतिक्रिया

    15-Jun-2023
Total Views |
 
Devendra Fadnavis
 
 
पालघर : कुठल्याही जाहिरातीमुळे वाद होईल इतकं तकलादू सरकार आमचं नाही. शिंदे आणि माझा प्रवास २५ वर्षांचा आहे. शिंदे आणि माझ्या एकत्र प्रवासाची चिंता नको. असं प्रत्त्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिलं आहे. पालघरमध्ये 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री म्हणाले, "मी हेलिकॉप्टरने पालघरला उतरलो तेव्हा मला पत्रकारांनी विचारले शिंदेंसोबत प्रवास करून कसे वाटत आहे. त्यावर मी म्हणालो, आमचा एकत्र प्रवास आताचा नव्हे तर गेल्या २५ वर्षांपासूनचा आहे. गेल्या वर्षभरात आमचा प्रवास आणखी घट्ट झाला आहे. त्यामुळे आमच्या प्रवासची चिंता करण्याचे काहीही कारण नाही. कुठल्याही जाहिरातीमुळे वाद होईल इतकं तकलादू सरकार आमचं नाही आहे. पालघर जिल्ह्यात शासन आपल्या दारी योजने अंतर्गत सरकार तुमच्यापर्यंत आले आहे. वर्षभरापूर्वी आपले सरकार आले अन् तुम्हाला दोन सरकारमधील फरक दिसत आहे. कारण मागील सरकार होते, सरकार आपल्या घरी, आताचे सरकार आहे आपल्या दारी." असं म्हणतं फडणवीसांनी यावेळी ठाकरेंना टोला लगावला.
 
 
 
 
 
 
मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जनतेसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय सेवा मोफत मिळाव्यात यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याशिवाय महिलांना एसटी मध्ये 50 टक्के सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले. ओबीसींनाही मोठ्या प्रमाणात घर देणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.