ठाणे : ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातुन ’मोबाईल जिहाद पुकारणारा आरोपी मुंब्य्रातील असल्याचे उघड झाल्यानंतर आता आणखी एका धर्मांतर प्रकरणातील आरोपीही मुंब्य्रातीलच असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंब्रा धर्मांध कट्टरपंथीयांसाठी आश्रयस्थान ठरू लागले असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाल्याचे म्हटले जात आहे.
याबाबतचे वृत्त असे की, वसईतील राजेश जानी या व्यक्तीला धर्मांध मोहसीन सोनी याने कट कारस्थान करुन मुस्लिम केले होते. त्यानंतर जानी यांच्या १८ वर्षांच्या देवांग जानी या मुलालाही मुस्लिम बनविण्याचा डाव मोहसीन सोनी याने टाकला. मात्र या मुलाने पोलिसांमध्ये धाव घेतल्याने माणिकपूर पोलिसांनी मोहसीन सोनी या आरोपीला मुंब्रा येथून अटक केली आहे.
वसईच्या मिस्त्रीनगर येथे राहणार्या देवांग जानी या १८ वर्षीय युवकाचे वडील राजेश जानी हे मुस्लिम धर्माच्या प्रभावाखाली आले आहेत. त्यानंतर काही दिवसांपासून देवांग यास मुंब्रा येथील मोहसीन सोनी हा आरोपी वारंवार फोन करून हिंदु धर्माबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करून, इस्लाम धर्माची महती सांगत होता. तुझे वडील आमच्या धर्मात आहेत, तु सुध्दा आमच्यात ये. अशी प्रलोभने मोहसीन हा देवांग याला देत वसईत धर्मांतराचा डाव उधळला! होता.
यासाठी, मोहसीन याने आपल्याकडे अदभूत, दिव्य शक्ती असल्याचा दावा केला होता. मात्र देवांग त्यांच्या जाळ्यात अडकला नाही. त्याने थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी मोहसीन याला मुंब्रा येथून अटक केली. त्याच्याविरोधात अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याला मुंब्य्रातुन जेरबंद करण्यात आले. आरोपीला वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता १८ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.