युट्युर्बसाठी आनंदाची बातमी!

    14-Jun-2023
Total Views |
youtube now allow anyone with 500 subscribers

मुंबई
: तुम्ही जर युट्युबवर कंटेट क्रिएटर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. युट्युबने मॉनिटायझेशन संबंधित धोरणात काही बदल केले आहेत. या बदलांमुळे युट्युबर्सना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मॉनिटायझेशनसाठी लागणाऱ्या १ हजार सबस्क्रायबर्सची संख्या आता ५०० करण्यात आली आहे. हा नवा निर्णय लागू करतानाच ४ हजार तासांचा वॉच टायमिंग ३ हजार तासांवर करण्यात आला आहे. तसेच, शॉर्ट व्ह्युज संदर्भात संख्या ही १० मिलियन वरुन ३ मिलियन इतकी करण्यात आली आहे.

दरम्यान, तुम्ही युट्युबवर अधिक सदस्य मिळविण्यासाठी धडपड करणारे कंटेंट क्रिएटर आहात तर आता गुगलच्या मालकीच्या व्हिडिओ कंपनीने किमान सदस्य संख्या हजार वरून ५०० पर्यंत कमी केली असून प्लॅटफॉर्मवर लहान निर्मात्यांना अधिक संधी देण्यासाठी युट्युबच्या कमाई धोरणांमध्ये मोठे बदल करत आहे. त्याचप्रमाणे, कंपनीने घोषणा केली आहे की, युट्युब भागीदार कार्यक्रमासाठी पात्रता आवश्यकता कमी करत असून कमी फॉलोअर्स असलेल्या निर्मात्यांसाठी उपलब्ध कमाई पद्धतींची श्रेणी विस्तृत करत आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.