नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना लंडनमधील सेंट्रल बँकिंगने 2023 साठीचा 'गव्हर्नर ऑफ द इयर' हा पुरस्कार प्रदान केला आहे. सेंट्रल बँकिंग हे एक जर्नल आहे. महागाई व्यवस्थापन, कोविड-19 महामारी आणि जागतिक संकटाच्या काळात भारतातील बँकिंग प्रणाली उत्तम प्रकारे हाताळल्याबद्दल शक्तिकांत दास यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सेंट्रल बँकिंग ही संस्था पुरस्कार देताना म्हणाली की, आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत आणि त्यांनी कोरोनाच्या कठीण काळात भारताच्या बॅंकिंग सेक्टरच नेतृत्व केले आहे. मार्च 2023 मध्ये, प्रकाशनाने त्यांना हा पुरस्कार देण्याची शिफारस केली होती. कोविड-19 महामारी, रशिया-युक्रेन युद्ध या संकटाच्या काळात त्यांनी भारताच्या बँकिंग सेक्टरच अतिशय चांगल्या पध्दतीने नेतृत्व केल.
शक्तिकांत दास हे तामिळनाडू केडरचे 1980 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. आयएएस असताना त्यांनी तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केल आहे. आरबीआय गव्हर्नर होण्यापूर्वी त्यांनी जागतिक बँक, एडीबी, एनडीबी आणि एआईआईबीमध्ये भारतासाठी पर्यायी गव्हर्नरची भूमिका बजावली आहे.