भोपाळ : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका हिंदू तरुणाला मुस्लीम तरुणीशी लग्न केल्याने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.तसेच त्याला इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले जात आहे. दि. १२ जून रोजी पीडितेने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. पीडित नवीनने या वर्षी मे महिन्यात फरजानासोबत मंदिरात लग्न केले होते.
हे प्रकरण मुरेनाच्या सिव्हिल लाइन्स क्षेत्राशी संबंधित आहे. २१ वर्षीय नवीन शाक्य आणि मुंबईत राहणारी २० वर्षीय फरजाना यांचे ३ वर्षापासून एकमेकांवर प्रेम होते. फरजाना ही एका नातेवाईकाच्या घरी मुरैना येथे आली असता दोघांची ओळख झाली. काही काळानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दोन्ही कुटुंबांचा या लग्नाला विरोध होता. मात्र नंतर नवीनच्या कुटुंबीयांनी या नात्याला होकार दिला.मात्र फरजानाचे कुटुंब शेवटपर्यंत या नात्याच्या विरोधात राहिले. ते त्याला मुंबईला बोलवू लागले. कुटुंबीयांचा वाढता दबाव पाहून नवीन आणि फरजानाने मे २०२३ मध्ये मंदिरात लग्न केले. या लग्नात नवीनच्या मित्रांनी सहकार्य केले. लग्नानंतर फरजाना हिंदू रितीरिवाजांचे पालन करण्यास सुरूवात केली. मात्र या लग्नाची माहिती फरजानाच्या घरच्यांना कळताच तिचा भाऊ आणि वडिलांनी नवीनला फोन केला. आणि नवीनला इस्लाम स्वीकारण्यास सांगून जरल तु असे केलेस तर आम्ही तुला स्विकारू असे ही सांगितले.
मात्र नवीनने इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यावर आरोपीने त्याला आणि त्याच्या आजोबांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. या धमक्यांनी व्यथित झालेल्या नवीनने त्याची पत्नी फरजानासोबत दि. १२ जून रोजी ग्वाल्हेरच्या एसएसपींची भेट घेतली. आणि सुरक्षेची मागणी केली. तसेच कोणाच्याही दबावाखाली तो धर्म बदलणार नाही, असे नवीनचे म्हणणे आहे. ग्वाल्हेरचे एसएसपी राजेश सिंह चंदेल यांनी मोरेना पोलिसांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.