मुंबई : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी १३ जून रोजी भाजपा प्रदेश कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यासंबंधी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत माहिती दिली. भिडे गुरुजी ऋषीतुल्य व्यक्तीमत्व, संत परंपरा आणि हिंदू संस्कृती जोपासणारे व्यक्तिमत्व, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित केले. असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक वंदनीय श्री. संभाजी भिडे गुरुजी यांना भेटण्याचा योग आला. आज गुरुजींनी भाजपा प्रदेश कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. प्रसंगी विविध विषयांवर संवाद साधला. भिडे गुरुजी म्हणजे संत परंपरा आणि हिंदू संस्कृती जोपासणारे व्यक्तिमत्व, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित केले. अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या सहवासात काही क्षण घालवून त्यांचे विचार जाणून घेता आले, याचे निश्चितच समाधान आहे. त्यांचे राष्ट्रसेवेसाठी अविरत सुरू असलेले कार्य आणि ऊर्जा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे."