Google Pay ची नवीन सेवा, यूजर्स डेबिट कार्डशिवाय UPI पिन सेट करू शकणार!

    12-Jun-2023
Total Views |
google-pay-launches-new-service

मुंबई
: जर तुम्ही Google pay वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Google payने आपल्या यूजर्ससाठी एक खास फीचर आणले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून तुमचा आधार क्रमांक वापरून नव्याने सादर करण्यात आलेल्या सेवेमुळे UPI साठी नोंदणी करणे सोपे झाले आहे. Google pay नुसार, आधार आधारित सेवा वापरून लाखो भारतीय वापरकर्त्यांचे काम सोपे केले जाते. हे नवीन फीचर कसे काम करेल .

डेबिट कार्डशिवाय UPI पिन सेट करणे शक्य होणार
 
अलीकडील आधारकार्डवर आधारित UPI सेवेसह Google Pay वापरकर्ते आता डेबिट कार्ड न वापरता त्यांचा पिन सेट करू शकतील. सध्या ही सुविधा फक्त बँक खातेदारांसाठी उपलब्ध आहे. UIDAI च्या आकडेवारीनुसार, भारतातील ९९.९ टक्क्यांहून अधिक प्रौढ लोकांकडे आधार कार्ड आहे आणि ते महिन्यातून एकदा तरी त्याचा वापर करतात. त्यामुळे या सेवेमुळे एटीएम कार्डसह पिन सेट करण्यापासून सुटका होणार आहे.

अशा प्रकारे तुम्ही फीचर वापरू शकता

आधार सिस्टम बेस्ड आधारित UPI वापरण्यासाठी, तुम्हाला आधार आणि बँकेकडे त्यांचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आवश्यक असेल. यानंतर, वापरकर्ते Google Pay वर डेबिट कार्ड किंवा आधार आधारित UPI ऑनबोर्डिंग यापैकी एक निवडण्यास सक्षम असतील. आधारचा पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे सुरुवातीचे ६ अंक प्रविष्ट करावे लागतील. यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्ही त्याचा वापर करू शकाल.