औरंगजेब आपला होउच शकत नाही : आ. हसन मुश्रीफ

    12-Jun-2023
Total Views |
NCP MLA Hasan Mushrif

महाराष्ट्र
: कागलमध्ये आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्याने तणाव निर्माण झाला, त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, औरंगजेब हा आपला कधीच होऊ शकत नसून त्याचे उदात्तीकरणसुध्दा होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, मुस्लिम समाजातील कुटुंबांनी आपल्या लहान मुलांना समजावून सांगण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, गेल्या आठवडा झालेल्या प्रकारामुळे कोल्हापूरातील वातावरण बिघडलेले असून छत्रपती शिवाजी महाराज यांना कधी मुस्लिमांबद्दल आकस नव्हता, आ. हसन मुश्रीफ म्हणाले. तसेच मुस्लिम समाजालाही त्यांच्याबद्दल कधीच आकस राहिलेला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर जीवाची बाजी लावून महाराजांची आग्र्याहून सुटका करणारे मदारी मेहतर असो किंवा अन्य २२ वतनदार असो वा सैन्याचे प्रमुख असो या सर्व विश्वासूंशिवाय महाराज स्वराज्याची लढाई लढू शकले नसते, असे मुश्रीफ म्हणाले.

तसेच, इतके सैन्य प्रमुख व मावळ्यांसोबत शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सैन्याशी लढाई केली. त्यामुळे औरंगजेब आपला होऊच शकत नाही, असे स्पष्ट मत माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. मुस्लिम धर्मीयांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज असून हा इतिहास समजून सांगण्याची आवश्यकता आहे, असे मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. दरम्यान, हिंदू-मुस्लिम समाजाने एकमेकांमध्ये सलोखा राहून शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.