विठ्ठलरूपी महिला भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या खास उपाययोजना!

    10-Jun-2023
Total Views |
 
Shinde-Fadnavis
 
 
मुंबई : यंदाच्या वारीत सरकारच्या काही खास उपाययोजना विठ्ठलरूपी महिला भाविकांसाठी असणार आहेत. यासंबंधी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. ही मायबाप जनताच आपल्या शिंदे-फडणवीस सरकारसाठी खरा विठ्ठल आहे. विेठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या जयघोषात पंढरीच्या वारीला सुरूवात झाली आहे. असं ही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
 
 
 
" ४८८ आरोग्य कर्मचारी, प्रत्येक पथकात एक महिला आरोग्य कर्मचारी. आरोग्य केंद्रात हिरकणी कक्ष, महिला निवारा कक्षात महिला नोडल अधिकारी, निर्भया पथकाची गस्त, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था, महिला समन्वयक सोबत असणार." अशा काही खास उपाययोजनांची माहिती वाघ यांनी यावेळी दिली.