नवी दिल्ली : नुकताच दि.५ मे रोजी ' द केरला स्टोरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. काही ठिकाणी या चित्रपटाविरोधात आंदोलने झाली तर काही ठिकाणी ह्या चित्रपटाला करमुक्त करण्यात आले. पण या चित्रपटात दाखवलेल्या अनेक घटना ह्या केरळमध्ये राहणाऱ्या तरुणींच्या आयुष्याशी साम्य दर्शवणाऱ्या आहेत. केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर चाललेल्या धर्मांतरामुळे श्रुती नावाच्या तरूणीने रहमत नाव स्विकारले होते.
श्रुतीचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता.श्रुती ही केरळमधील एका ग्रामीण भागातील रहिवाशी आहे. श्रुतीने आपल्या पदवीच्या शिक्षणासाठी एका खासगी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. त्यावेळी तिथे तिच्या बहुतेक वर्गमित्र मुस्लिम मुली होत्या.त्यावेळी त्या मुस्लिम मुलींनी श्रुतीच्या स्वभाववृत्ती, दृष्टीकोनाबद्दल अभ्यास केला.आणि त्या लोकांनी श्रुतीवर इस्लामचा प्रभाव पडण्याचा प्रयत्न केला. त्या मुली अधिकाधिक इस्लामबद्दल श्रुतीला सांगत असत. तसेच श्रुतीला हिंदू धर्माबद्दल अनेक प्रश्न त्या मुली विचारायच्या त्या प्रश्नांची उत्तरे श्रुतीजवळ नव्हती. श्रुती म्हणते, . मला टीव्हीवरील ओम नमः शिवाय आणि जय हनुमान यांसारख्या मालिकांमधून बरेच काही माहित होते. पण त्या मुलीच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मला देत येत नसत. त्यामुळेच . माझ्या वर्गातील लोकांनी या गोष्टीचा फायदा घेतला, असे श्रुती सांगते. तसेच श्रुतीने सांगितले की, नंतर मुस्लिम वर्गमित्रांनी त्यांच्या धर्माबद्दल स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली.त्यानंतर त्या मुलींनी हळूहळू स्वताच्या धर्माविषयी माझ्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आणि माझा ब्रेनवॅाश करून इस्लाम धर्म स्विकारण्यास भाग पाडले.
या ब्रेनवॅाश केल्याच्या घटनेनंतर श्रुतीने शिक्षण सोडून दिले. श्रुतीने सांगितले की, मुस्लीम मित्र म्हणायचे, 'बुरखा पद्धत मुलींच्या सुरक्षेसाठी आहे.इस्लाम ही योग्य विचारधारा आणि ईश्वराची योग्य संकल्पना आहे. जगण्याचा हाच योग्य मार्ग आहे.असे ते समजावून सांगायचे. हळू हळू ऐकायला आवडू लागलं. तो आपल्या धर्माबद्दल शिकवत असे.त्यानंतर श्रुतीने नमाज पठन करणे , अल्लाला मानणे,रोजा ठेवणे अशा सर्व गोष्टी ती करू लागली. त्यामुळे तिने इस्लाम धर्म पुर्णपणे स्विकारला.तसेच केरळमधील तथाकथित "मिनी-मक्का" येथील धर्मांतर केंद्राद्वारे कागदावर इस्लाम श्रुतीने स्विकारला होता. या सगळ्याचा परिणाम असा झाला की , एक दिवस रोजा ठेवलेल्या श्रुतीने आपल्या आईने आणलेल्या जेवनाला नाही म्हणत. आईला काफिर म्हणत आईवर हात उचलाल. मात्र आता श्रुती हिंदू धर्मात परतली आहे. आणि इस्लामचा बळी होण्यापासून तिला वाचवण्यात आले आहे.