गो फर्स्ट दिवाळखोरी ; ९ मे पर्यंतची उड्डाणे रद्द

    04-May-2023
Total Views |
Gofirst cancels all flights till may 9 closes ticket sales till may

नवी दिल्ली
: आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या गो फर्स्ट हा विमान कंपनीने ९ मेपर्यंतची सर्व उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. डीजीसीएने विमान कंपनीस प्रवाशांचे पैसे परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गो फर्स्टने आता 9 मे पर्यंतची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. एअरलाइन्सने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यानुसार, ऑपरेशनल कारणांमुळे ने 9 मे 2023 पर्यंत आपली उड्डाणे रद्द केली आहेत. उड्डाण रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल विमान कंपन्यांनी खेद व्यक्त केला आहे. एअरलाइन्सने म्हटले आहे की प्रवाशांना पूर्ण परतावा लवकरच दिला जाईल.

त्याचप्रमाणे गो फर्स्टने 15 मे पर्यंत तिकिटांच्या विक्रीवर बंदी घातली आहे आणि सध्याच्या बुकिंगच्या तारखांमध्येही बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. डीजीसीएने यापूर्वी 3 मे ते 5 मे पर्यंतची उड्डाणे रद्द करण्यासाठी एअरलाइनला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर मिळाल्यानंतर, डीजीसीएने सांगितले की विमान कंपनीद्वारे द्वारे अचानक उड्डाणे स्थगित केल्यामुळे प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत.दरम्यान, कंपनीने दिवाळखोरीच्या कारवाईअंतर्गत केंद्र सरकारला संकटातून बाहेर काढण्याची मागणी देखील केली आहे.