दिल्ली हत्याकांडातही केरला स्टोरी पॅटर्न? : पडद्यामागे आणखी पाच जण!

पोलीस तपासात धक्कादायक बाब उघडकीस

    30-May-2023
Total Views |
delhi-murder-case-police-all-set-to-investigate-six-characters-friends-of-sahil-and-sakshi

नवी दिल्ली : दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात दि.२९ मे रोजी एका अल्पवयीन मुलीची साहिल उर्फ मोहम्मद सरफराज यांने सूरा भोसकूनव हत्या केली. आरोपी मोहम्मद सरफराजला पोलीसांनी अटक केली असून या हत्याकांडात ६ आणखून संशयितांचा शोध पोलीसांकडून सुरू आहे.दिल्ली हत्याकांडात पोलीस आता या संशयिताची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी साहिलला २ दिवसांचा रिमांड मिळाल्यानंतर आता पोलिसांनी संशयिताच्या चौकशीची तयारी सुरू केली आहे.

दिल्ली हत्याकांडातील संशयित कोण आहेत?

संशयित क्रमांक १ : साहिल हा साक्षीचा मित्र असून त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे. त्यानेच साक्षीची निर्घृण हत्या केली. सध्या त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संशयित क्रमांक २ : दिल्ली हत्याकांडातील दुसरा संशयित प्रवीण हा आहे. तो पीडितेचा एक्स बॅायफ्रेंड आहे. तसेच साक्षीच्या हातावर प्रवीणचे नाव गोंदवले असल्याचे तपासात उघड झाले आहे. प्रवीण सध्या जौनपूरमध्ये असून पोलीस लवकरच दिल्लीत त्याची चौकशी करणार आहेत.

संशयित क्रमांक ३ : पीडितेची मैत्रिण नीतू ही देखील संशयित आहे. गेल्या काही दिवसांपासून साक्षी ही नीतूसोबत शाहबाद डेअरी परिसरातील तिच्या घरी राहत होती. नीतूचा पती सध्या एका प्रकरणात तिहार तुरुंगात बंद आहे. साक्षी आणि साहिलच्या मैत्रीबद्दल आणि नाराजीबद्दलही नीतूकडे महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता पोलिसांना आहे. अशा स्थितीत नीतूची चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे.

संशयित क्रमांक ४ : आरती ही देखील साक्षीची मैत्रीण आहे. आरती साक्षीला तिच्या हत्येच्या काही तास आधी भेटली होती. आरती आणि साक्षी दोघीही शाहबाद परिसरातील आठवडी बाजारात भेटल्या होत्या. जेव्हा साक्षी आरतीला भेटून परतत होती, त्याचवेळी साहिलने साक्षीची हत्या केली. साहिल तिचा पाठलाग करून त्रास देत असल्याची तक्रार साक्षीने केली होती, असा आरोप आरतीने केला होता.

संशयित क्रमांक ५ : मोहम्मद सरफराजचा मित्र आकाशचाही पोलिसांच्या चौकशीच्या यादीत समावेश आहे. साक्षीच्या हत्येपूर्वी, आकाश साहिलसोबत शाहबाद डेअरी परिसरात गुन्हेगारीच्या ठिकाणी उभा होता. त्यावेळी साहिल तिथे साक्षीची वाट पाहत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये साहिल-आकाश दोघेही घटनास्थळी बोलताना दिसत आहेत. अशा स्थितीत आकाशला खुनाची माहिती होती का? साक्षीच्या हत्येत आकाशची काही भूमिका आहे का, या बाजूने त्यांची चौकशी केली जाणार आहे.

संशयित क्रमांक ६ : साक्षीचा मित्र झबरूचाही पोलीसांच्या चौकशीच्या यादीत समावेश आहे. झबरू हा शाहबाद डेअरीतील जे.जे .कॅालनीत राहत असे. साक्षीचा पाठलाग थांबवला नाही तर ठार मारेन ,अशी धमकी झबरूने मोहम्मद सरफराजला दिली होती. असे साहिलने चौकशीदरम्यान सांगितले. त्यामुळे झबरूची ही चौकशी पोलीस करणार आहेत.

याशिवाय दिल्ली पोलीस साक्षी-नीतू आणि साहिलच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चौकशी करत आहेत. साहिलच्या काही पोस्ट्सवरून असे समोर आले आहे की त्याची अनेक मुलींशी मैत्री होती आणि साक्षीला चिडवण्यासाठी तो या मैत्रिणींची मदत त्याच्या प्रोफाइलवर कमेंट करत असे.