मुन्नाभाई स्टाइल कॉपी करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक!
30-May-2023
Total Views |
नाशिक : मुन्नाभाई स्टाइल कॉपी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या लिपिक पदासाठी परीक्षा होती. बटन कॅमेरा आणि ब्ल्यू टूथच्या मदतीने कॉपी केल्याच उघड झालं आहे. मूळ उमेदवार, डमी उमेदवार, उत्तर पुरवणारे आशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या लिपिक पदासाठी परीक्षा सुरु असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. कॉपीचे रॅकेट आणखी मोठे असण्याची शक्यता देखील पोलिसांकडुन वर्तवली जात आहे. यासंबंधी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.