आजारपणातील अवस्थेमध्ये, माणसाला निरोगी व बरे असण्याची भावना निर्माण होण्यासाठी बर्याच अटी व अडथळे तयार होत असतात. त्या अटींची पूर्तता केल्याशिवाय त्यांना बरे वाटत नाही. जर अमुक एक गोष्ट झाली तरच मला बरे वाटेल, अशाप्रकारची भावना तयार होते व ही भावना मुखत्त्वे करून मनातील भीतीमुळे, भयगंडमुळे याशिवाय मनातील काही निश्चित केलेल्या कल्पनांमुळे तयार होत असते. उदाहरणार्थ, एखाद्या लोभी, स्वभावाच्या माणसाला मनात सतत भीती असते की, आपली संपत्ती कोणी नेईल की काय? एखाद्या संशयी स्वभावाच्या माणसाला सतत मनात भीती असते की, कोणी आपल्याला फसवते आहे की काय? त्यामुळे अशा स्थितीला निरोगी स्थिती म्हणता येत नाही.
या अशा अटी व मनातील भ्रामक कल्पना यांच्यामुळे माणसाची बाहेरील घटनांशी मिळतेजुळते घ्यायची किंवा त्यांना प्रतिक्रिया द्यायची ताकद ही कमजोर होऊन जाते आणि त्या प्रतिक्रियेला येणारा अडथळा हाच आजाराचा मापदंड असतो. अशा अडथळ्यांमुळे शरीराची व मनाची सहजता लोप पावते आणि त्यामुळे माणूस बर्याच गोष्टीत व स्थितीत बरा नसतो आणि बरे वाटण्यासाठी या अनेक अटी व अडथळ्यांना काढून टाकावे लागते, तरच माणसालाही बरे असण्याची स्थिती निर्माण होते. एखाद्या महत्त्वाकांक्षी माणसाला जवळजवळ प्रत्येक स्थितीमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते, त्यावेळी त्याच्या महत्त्वाकांक्षेशी त्याचे काही देणेघेणे नसते. परंतु, त्याच्या मानसिक स्थितीमुळे व भ्रामक कल्पनामुळे त्यांना असे वाटत असते.
आजारी स्थितीतील माणूस हा भ्रमीत अवस्थेत असतो, भ्रामक कल्पनांचा पगडा त्याच्यावर जास्त असतो. उदा. घरातून निघताना लावलेले कुलूप दहा वेळा खेचून पाहणारे लोक, सतत एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा तपासणारे लोक, हे असुरक्षिततेची आजारी भावना व भ्रम घेऊन जगत असतात. आजारी माणसाची स्थिती म्हणजे गाडीमध्ये बसलेल्या अशा माणसाची स्थिती असते, ज्याला असे समजते की, त्याच्या गाडीचा फक्त पहिला गीयर काम करत आहे. अशावेळी तो माणूस असुरक्षित भावना मनात तयार करतो व चढणीवर गाडी चालवू असे त्याच्या मनात येते. कारण, चढणीवर गाडी चालवणे हे पहिल्या गीयरमध्ये सोपे जाते व रस्त्यावर इतरांच्या आपण मागे पड़ू ही भावनाही कमी होते. परंतु, त्यामुळे त्याला सतत चढणीवरच चढावे लागते. ही झाली आजाराची भ्रमीत अवस्था व बरे वाटण्यासाठी पूर्ण करावे लागणारे अडथळे व अटी!
आजारी स्थिती ही एकतर संपूर्ण प्राण्याला त्रासदायक स्थिती असते. (Generalised) किंवा काही अवयवांपुरती मर्यादित असते ((localise). परंतु, असे लक्षात आले आहे की, ही Generalised आजारी स्थिती localise स्थितीच्या आधी तयार होत असते. त्यामुळे आजारी माणसाी जनरल किंवा सर्वसाधारण स्थिती, ही सर्व प्रथम आजारी स्थितीला कशी धारण करते, हे फार महत्त्वाचे असते. माणसाच्या मनात वा शरीरात तयार होणारे Symptoms म्हणजेच लक्षणे व चिन्हे ही कशाप्रकारे दिसून येतात, हे धारण करण्याच्या स्थितीवर अवलंबून असते. यालाच ’Adaptation mechanism’ असे म्हणतात. (क्रमश:)