गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये क्यूआर कोड बंधनकारक

"महारेरा"चे गृहनिर्माण प्रकल्पांना आदेश

    29-May-2023
Total Views |
MAHARERA Maharashtra Housing Society

मुंबई
: गृहनिर्माण संस्थांकडून प्रस्तावित असणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांची माहिती देण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. या जाहिरातींमध्ये आता क्यूआर कोड दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. महारेराने याबाबत नुकतेच आदेश दिले आहेत.

राज्यातील गृहनिर्माण संस्थांकडून प्रकल्पाबाबत जनतेला मागिती देण्यासाठी आपल्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. या जाहिरातींमध्ये आता एक ऑगस्ट पासून प्रकल्पांशी संबंधित माहिती देण्यासाठी क्यूआर कोड देणे बंधनकारक करण्यात आले आहे. महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्या माहितीच्या बाजूलाच क्यूआर कोड ठळकपणे दाखवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जुन्या संस्थांनाही क्यूआर कोड

दरम्यान, क्यूआर कोड स्कॅन करताच एका क्लिकवर प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांना देखील निर्णय घेताना मदत होणार आहे. मार्च २०२०३ अखेरपासून 'महारेरा'कडे नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोड महारेराकडून देण्यात आले आहेत. तसेच जुन्या प्रकल्पांनाही महारेरातर्फे क्यूआर कोड देण्यात आले आहेत.