सावरकरांचे जीवनचरित्र वेबसीरिजच्या माध्यमातून मांडणार : योगेश सोमण

    28-May-2023
Total Views |
Veer Savarkar Secret Files Director Soman

पुणे
: "वीर सावरकर, सिक्रेट फाईल्स" या वेब सीरीजची नुकतीच घोषणा करण्यात आली असून दिग्दर्शक योगेश सोमण यांनी याविषयी भाष्य केले आहे. "वीर सावरकर : सिक्रेट फाईल्स" ही वेब सीरीज तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सावरकरांचे जीवनचरित्र वेबसीरिजच्या माध्यमांतून पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सावरकरांचे खरे चरित्र, माहिती राष्ट्रीय स्तरावर पोहोचविणे हे आमचे कर्तव्य आहे. पुण्यातील कापडाची होळी, अभिनव भारत संघटना असो या सगळ्या प्रसंगांचे, घटनांचे चित्रण हे पहिल्या भागामध्ये चित्रीत होणार आहे, असे योगेश सोमण यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर १० एपिसोड्सचा १ सीजन असे एकूण ३० एपिसोड्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. येत्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म हा खूपच लोकप्रिय ठरणार असून त्याद्वारे सावरकरांचे चरित्र लोकांपर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे दिग्दर्शक साेमण यांनी सांगितले. 

दरम्यान, राष्ट्रीय पातळीवरील लोकांना सावरकरांविषयी माहिती मिळावी याकरिता  हिंदीतूनही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे.  तसेच , योगेश सोमण यांनी १९९६ सावरकरांच्या माझी जन्मठेप वर नाटक ते वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स ( वेब सिरीज ) व्हाया स्वातंत्र्यवीर, दुरदर्शनवरील मराठी मालिका , सावरकर चित्रपटात बासू भट्टाचार्य यांना सहाय्यक दिग्दर्शक, मी विनायक दामोदर सावरकर चे शेकडो प्रयोग, सावरकर आणि मृत्यू संवाद चे लेखन/दिग्दर्शन, शेकडो व्याख्याने हा प्रवास आनंददायी झाला. आजवरचा प्रवास हा केवळ तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादानेच. अशाच शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी राहुदेत, अशी आर्त साद योगेश सोमणांनी रसिकांना घातली.