मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मह्त्त्वांकाक्षी प्रकल्पातील एक 'वंदे भारत एक्सप्रेस' अंतर्गत देशाच्या विविध भागात रेल्वे जाळे अत्याधुनिक केले जात आहे. मुंबईतदेखील आता वंदे भारत मेट्रोद्वारे रेल्वे प्रवास जलद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारकडून मुंबईकरांना २३८ वंदे भारत मेट्रोची भेट मिळणार आहे. अशी माहिती रेल्वे बोर्डाने सांगितली आहे. या वंदे भारत मेट्रोमुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी अत्याधुनिक होणार आहे. मुंबईतल्या लोकल ट्रेनच्या बदल्यात या नवीन वंदे भारत मेट्रो लवकरच धावणार आहेत. या वंदे भारत मेट्रोकरिता रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार खर्च करणार आहे.
या नव्या ट्रेनच्या प्रकल्पाला रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर रेल्वे प्रवास क्षमतेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने सांगितली आहे. त्याचबरोबर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नव्या रेल्वे २०२३ पर्यंत रुळावर धावतील, असे याआधीच स्पष्ट केले आहे.