मुंबई : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर अभिनेता रणदीप हुड्डा यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर उर्फ वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. सावरकरांची आज १४० वी जयंती आहे. यानिमित्ताने चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना चित्रपटाची पहिली झलक दाखवण्यात आली आहे.
टीझरची सुरुवात रणदीप हुड्डाच्या अभिनयाने वीर सावरकरच्या भूमिकेतून होते. त्यात सावरकर चालताना दिसतात. त्यानंतर शहरभर आगीचे लोळ दिसून येतात. यानंतर सावरकर नदीत उडी मारताना दिसतात. तसेच आगीच्या भक्ष्यस्थानी ब्रिटिश राजवटीतील पोलिसांकडून माणसांवर अत्याचार होताना दिसतात. मात्र या सगळ्यात सावरकर बनलेल्या रणदीपचा चेहरा दिसत नाही. फक्त आवाज ऐकू येतो.
त्यात ते म्हणतात की, 'स्वातंत्र्य लढा १९ वर्षे चालला. पण ही लढाई काही मोजक्याच लोकांनी लढवली. बाकी सगळे सत्तेचे भुकेले होते. गांधीजी वाईट नव्हते, पण जर ते त्यांच्या अहिंसक विचारावर ठाम राहिले नसते तर भारत ३५ वर्षे आधीच स्वतंत्र झाला असता. यानंतर रणदीप हुड्डा बेड्यांमध्ये बांधलेला दिसतो.