दुसऱ्यांचे वाभाडे काढून अंधारेंनी लोकप्रियता जपली : संजय शिरसाट
28-May-2023
Total Views |
मुंबई : सुषमा अंधारे यांच्यावर संजय शिरसाट यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 'गौतमी पाटील आणि सुषमा अंधारे दोन्ही अॅक्टर आहेत. त्यामुळे अंधारे यांनी गौतमीला सपोर्ट केला. इमानदारीने पोटासाठी कला सादर करते म्हणून ती वाईट आहे, असे मी म्हणणार नाही. ती तिच्या पोटासाठी खूप महत्त्वांच काम करत आहे. कुणाचा तळतळाट घेऊन वाभाडे काढून नाव ठेवून सुषमा अंधारे यांनी तिची लोकप्रियता जपली आहे, असे शिरसाट म्हणाले.
दरम्यान संजय शिरसाट यांनी दि. २८ मे च्या सामना या वृत्तपत्रातील 'दिल्लीत युद्धाचा प्रसंग , नव्या संसदेचे नवे मालक’ या अग्रलेखावर म्हणाले की, संजय राऊतला कोणतं युद्ध दिसत आहे ते मला माहित नाही. देशावर युद्धाचं सावट नाही. संजय राऊतला अंतर्गत युद्ध करायचा असेल. संजय राऊतसारख्या छोट्या-मोठ्या नेत्यांनी टीका करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही फरक पडत नाही, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.