गडकिल्ल्यांवर पुन्हा घुसखोरीचे प्रयत्न ?

पन्हाळा गडावर अनधिकृत दर्गा बांधण्याच्या हालचाली ?

    26-May-2023
Total Views |
 
Panhala Fort
 
 
कोल्हापूर : ऐतिहासिक पन्हाळा गडावर अनधिकृतपणे दर्गा बांधण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा कोल्हापुरातील हिंदुत्ववादी मंडळींनी केला आहे.
 
पन्हाळा किल्ल्यावर मागील दोन ते तीन महिन्यापासून दर्गा उभारण्यासाठी अतिक्रमण करण्यात येत असून दर्ग्याचे बांधकाम करण्याच्या दृष्टीने पाऊले टाकली जात असल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.
 
हा प्रकार उघडकीस आणणाऱ्या एक युवकाला खोटा गुन्हा दाखल करून कायदेशीर बाबींचा गैरवापर करून अडकवले जात असून गडावर कब्जा करण्याचे काही विशिष्ट समुदायाचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही संघटनांकडून करण्यात आला आहे.