मविआची पुढची सभा मंगल कार्यालयात घ्या : नितेश राणे

    02-May-2023
Total Views |
Nitesh Rane

मुंबई
: छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील सभेनंतर मविआची वज्रमूठ सभा बीकेसीत दि.१ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या निमित्ताने राजधानी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा आघाडीचा विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न होता. पंरतू या सभेबद्दल बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, वज्रमूठ सभा ही बीकेसीच्या सर्वात लहान कोपऱ्यात आयोजित करण्यात आली होती. ते पाहता पुढील वज्रमूठ सभा ही एखाद्या मंगल कार्यालयात घेण्याची वेळ मविआवर येईल, असा टोला मविआच्या सभेवर नितेश राणेंनी मविआच्या सभेवर लगावला.
 
तसेच या सभेतील ८० टक्के लोक अल्पसंख्याक होते आणि त्यामुळेच मुस्लिम समाजातील लोकांना टोप्या काढून सभेला बसण्यास सांगितले त्यामुळे उद्धव ठाकरेंच हिंदुत्व हेच आहे का? , असा सवाल ही राणेंनी केला. तसेच अजित पवार करमुक्त आहेत. त्यामुळे मी त्यांच्या टीका करणार नाही, असे ही राणे म्हणाले. तसेच खासदार संजय राऊत हे मविआचा सकाळचा कर्मचारी आहे त्यामुळे तुमच्या कर्मचाऱ्यांची आमच्या नेत्यावरील टीका आम्ही सहन करणार नाही, असा इशारा ही राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला.