समीर वानखेडेंना दिलासा, अटकेपासून संरक्षण!

    19-May-2023
Total Views |
 
Sameer Wankhede
 
 
मुंबई : सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. २४ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण राहिल. सीबीआयकडून वानखेडेंवर तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप ही करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाकडून वानखेडेंनी तपासात सहकार्य करावे असे निर्देश करण्यात आले.
 
 
प्रकरण काय?
 
अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या कॉर्डेलिया ड्रग्ज क्रूज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. आर्यन खानला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरूख खान आणि त्याच्या कुटुंबियांकडून 25 कोटी रुपये खंडणीची मागणी करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. या संबंधी तपास सुरू असताना समीर वानखेडे यांनी महत्त्वाची दिली आहे. समीर वानखेडे आणि शाहरूख खान यांच्यात अनेकदा बोलणं झाल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे त्यांचे व्हॉट्स अँप चॅट्सचे त्यांनी शेअर केलेत.
 
 
Sameer Wankhede
 
 
शाहरूख खाननं समीर वानखेडे यांच्याकडे मुलगा आर्यन खानला सोडवण्यासाठी विनंती केल्याचं चॅटमधून उघड झालं आहे. या चॅटमध्ये शाहरूख खानने समीर वानखेडेंना म्हटलं आहे की, "मी एक बाप आहे आणि तुम्ही देखील बाप आहात. माझा मुलगा चुकला असेल पण त्याला सांभाळून घ्या. याबाबत आपल्याला काय करता येईल ते सगळं आपण करू." अशी विनंती शाहरूखनं केली आहे. एकदा नाही तर शाहरूखनं अनेकदा अशाप्रकारची विनंती समीर वानखेडे यांना केली आहे.