शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारेंची मारहाण झाल्यावर सुषमा अंधारेंना कोपरखळी
19-May-2023
Total Views | 99
45
मुंबई : "जिकडं राशन तिकडं भाषण! सुषमाताई हे खरं आहे का?" असं म्हणत शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारेंनी सुषमा अंधारेंचा समाचार घेतला आहे, बीड जिल्ह्यात झालेला सुषमा अंधारे यांच्याबरोबरचा प्रकार धक्कादायक आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. हे खरे आहेत का? सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का? महाप्रबोधन यात्रेच्या वेळेला अवकाळी पाऊस पडला तरी सुषमा अंधारे म्हणतील ही शिंदे गटाची स्क्रिप्ट आहे. असं म्हणत ज्योती वाघमारेंनी अंधारेंवर निशाणा साधला आहे.
ज्योती वाघमारे म्हणाल्या, "सुषमा अंधारे यांना मारहाण केली. याचा मी निषेध करते. कुठल्याही महिलेच्या बाबचीच असं घडायला नको. पण, आप्पासाहेब जाधव यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. हे खरे आहेत का? आणि आम्ही जे ऐकलयं ते खरं आहे का? तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्यांकडुन पैसे घेता. पदांची विक्री करताय. दादागिरी करताय. तुमच्या ऑफिसमध्ये कार्यकर्त्यांच्या पैशाने फर्निचर बदलुन घेता. अन् तुमचेच जिल्हाप्रमुख आप्पासाहेब आरोप करतायत शेतकऱ्यांच्या मुलाचा घास हिरावुन पैसे घेताय. हे सर्व खरं आहे का?" असा सवाल त्यांनी यावेळी अंधारेंना केला.