उद्धव ठाकरेंची पुन्हा उबाठा प्रमुख म्हणून फेरनिवड होणार!
ओसाड गावची पाटीलकी : अतुल भातखळकर
18-May-2023
Total Views |
मुंबई : उद्धव ठाकरेंची पुन्हा उबाठा प्रमुख म्हणून फेरनिवड होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर ठाकरे गट अॅक्शन मोड मध्ये दिसुन येत आहे. शिवसेना फुटीनंतर आणि ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारी 2023 रोजी संपल्यानंतर प्रथमच शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक 18 जूनला मुंबईत होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षप्रमुखपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर व तांत्रिक त्रुटी राहू नयेत, यासाठी कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवश्यक ठराव आणि कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे.
दरम्यान, यावर "ओसाड गावची पाटीलकी... " असे म्हणत अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. या ट्विटद्वारे त्यानी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.