महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहा!

- उद्धव ठाकरेंचा आदेश

    17-May-2023
Total Views |
 
Uddhav Thackeray
 
 
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली आहे. मुंबईतील लोकसभा मतदारसंघातील अनेक उमेदवार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतून सध्याचे खासदार अरविंद सावंत यांच्या जागी राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या नावाची चर्चा असून त्यांना संधी दिली जाऊ शकते. तसंच अरविंद सावंत यांना उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या पूनम महाजन यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाऊ शकते.
 
उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहा असा आदेश पदाधिकाऱ्यांना दिला आहे. शिवसेना भवनवर झालेल्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले आहेत. दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर किंवा माजी महापौर विशाखा राऊत यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. तसंच ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय दिना पाटील किंवा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्याबाबत शिवसेना ठाकरे गोटात अंतिम चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.