मुंबई : अकोला दंगली प्रकरणी खासदार संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केली होती.आता या टीकेला आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. राणे म्हणाले की, राज्यातील दंगलीमागे उद्धव ठाकरेंचाच हात आहे.ते दंगलीच्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, असा आरोप ही राणेंनी ठाकरेंवर केला. तसेच 'सध्या राऊत मुस्लीम समाजाच्या प्रेमात पडले आहेत. त्यांचे संबध चेक केले पाहिजेत . राऊत अस्थिरता निर्माण करत आहे', असे ही राणे म्हणाले.
तसेच संजय राऊत मुस्लीम लीगचे प्रवक्ते आहेत. दंगली घडवणारे मास्टरमाईड कलानगरमध्ये बसलेत. शहरी नक्षलवादी आणि राऊतांचे गुण सारखेच आहेत, अशी टीका ही राणेंनी राऊतांवर केली आहे.