नवी दिल्ली : आयफोन निर्माता Apple ने आपल्या iPhone १५ मालिकेतील दोन मॉडेल्स तयार करण्यासाठी भारताची निवड केली आहे. टाटा समूह Apple चे आगामी मॉडेल iPhone १५ आणि iPhone १५ Plus भारतात असेंबल केले जाणार आहेत. याआधी फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि लक्सशेअर सारख्या कंपन्या भारतात आयफोन असेंबल करत आहेत. मात्र आता टाटा समूह सुद्धा या शर्यतीत सामील झाला आहे. टाटा समूह भारतात आयफोन बनवणारी चौथी कंपनी ठरणार आहे.
TrendForce च्या अहवालानुसार, टाटा समूहाला सुरुवातीला iPhone १५ आणि iPhone १५ Plus च्या उत्पादनाचा एक छोटासा भाग मिळेल. म्हणजेच टाटा दोन्ही मॉडेल्सपैकी फक्त ५ टक्के भाग असेंम्बल करेल.त्याचवेळी फॉक्सकॉन नवीन आयफोनच्या रेग्युलर व्हेरियंटपैकी ७० टक्के आणि लक्सशेअर रेग्युलर व्हेरिएंटच्या २५ टक्के भाग असेंम्बल करतील. Luxshare ला प्लस व्हेरियंटच्या असेंम्बल ऑर्डरपैकी ६० टक्के आणि Pegatron ला ३५ टक्के असेंम्बल ऑर्डर मिळाले आहेत. टाटा समूहाने आधीच बेंगळुरूमध्ये विस्ट्रॉनचा आयफोन प्लांट विकत घेतला आहे, जिथे आयफोन १५ मालिका एकत्र केली जाईल.
आयफोन सीरीज दरवर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्च केली जाते. या वर्षी देखील Apple कडून iPhone १५ सप्टेंबरमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. २०२३ मध्ये आयफोन सीरीजचे चार मॉडेल्स - आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स समाविष्ट केले जाऊ शकतात.