मुंबई : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात १३ मे रोजी दंगल उसळली.त्यानंतर त्या दगंलीत एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच २५ जणांना अटक करण्यात आली . मात्र या घटनेला आज दि.१५ मे रोजी दोन दिवसानंतर धक्कादायक भाष्य आमदार नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणे म्हणाले की, १३ आॅग्सट २००४ रोजी झालेल्या उद्धव ठाकरे यांनी आपला सरकार सत्तेत यांव यासाठी महाष्ट्रात दंगल घडवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता नाईलाजाने सत्तेतून पायउतार व्हायला लागलेल्या उद्धव ठाकरेंनी अकोलामधील दंगल घडवून आणली नाही आहे का? यांची चौकशी करावी. तसेच उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, अशी मागणी राणेंनी केली आहे.
दरम्यान मविआतील उद्धव ठाकरेंच्या सध्याच्या परिस्थिवर बोलताना राणे म्हणाले की, युतीत उद्धव ठाकरेंचा रूबाब होता. मात्र आता मविआत रूबाब संपला आहे. तसेच मविआत उद्धव ठाकरेंना आता सोफ्यावरून स्टूलवर बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्याला गृहमंत्री आहेत काय़ ? हा प्रश्न विचारणाऱ्यां कामगाराला आवरत गृहमंत्र्यांच्या आदेशावरून अकोल्यात झालेली कारवाई पाहावी, असे राणे म्हणाले आहेत. तसेच राऊतांचा घर फोडण्याचा आणि काड्या लावण्याचा इतिहास आहे, असे ही राणे म्हणाले.