महाराष्ट्रात दंगली घडवणाऱ्यांना अद्दल घडवू : देवेंद्र फडणवीस
15-May-2023
Total Views |
मुंबई : महाराष्ट्रात गेले काही दिवस तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अकोला आणि अहमदनगर येथे दोन गटात जोरदार राडा झाला. त्यानंतर काही वेळाने या राड्याचे रूपांतर विशिष्ट समाजाकडून दंगल घडवण्यात झाले. दरम्यान या दंगली घडलेल्या दोन्ही ठिकाणी शांतता असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच पोलीस अलर्ट मोडवर आहेत.त्यामुळे महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही.तसेच दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना अद्दल घडवणार , असे फडणवीस म्हणाले.
तसेच काही लोकांकडून जाणिवपुर्वेक दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे काही संस्था आणि लोक राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्नात आहेत पण आम्ही त्यांना अद्दल घडवू. त्याचबरोबर या दंगली भडकण्यासाठी आगीत तेल ओतणाऱ्यांना शिक्षा होईल, असे ही फडणवीस म्हणाले.