काँग्रेसचा विजय 'भारत जोडो यात्रे'मुळेच : राज ठाकरे

    14-May-2023
Total Views |
raj thackeray

मुंबई
: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचा विजय हा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळेच झाला आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी माध्यमांना दिली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा हा परिणाम असल्याचे राज ठाकरेंनी विधान केले. तसेच काँग्रेसच्या कर्नाटक विधानसभा विजयाचे श्रेय ठाकरेंनी काँग्रेस नेते राहुल गांधींचे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, राज ठाकरे म्हणाले, 'आपलं कोण वाकडं करू शकतो, असा जो विचार करतो त्याचा पराभव आहे. त्यामुळे जनतेला कुणीही गृहीत धरू नये याचा पुनरूच्चार राज ठाकरेंनी बोलताना केला. यातून सर्वांनी बोध घेण्याची गरज घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. कर्नाटकातील वागणुकीमुळे भाजपचा पराभव झाल्याचे राज ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच, पुढे काय घडू शकेल, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, अशी मिश्किल टिप्पणी यावेळी केली.