कोचीमध्ये २५०० किलो ड्रग्ज जप्त,पाकिस्तानातील संशयित ताब्यात!

    14-May-2023
Total Views |
indian-navy-and-ncb-recovered-drugs-from-kocchi-and-detained-1-pakistani-accused
 
कोची : भारतीय नौदलाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) सोबत केलेल्या संयुक्त कारवाईत केरळमधील कोची येथून अंमली पदार्थं जप्त केलेले आहेत. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २५०० किलोहून अधिक ड्रग्ज जप्त केल्याचा दावा केला जात आहे. औषधाचे नाव मेथॅम्फेटामाइन असे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या औषधाची किंमत सुमारे १२ हजार कोटी रुपये आहे. दि. १३ मे रोजी झालेल्या या कारवाईदरम्यान एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आले असून तो पाकिस्तानचा असल्याचे सांगण्यात येत आहे.



मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मोहिमेला 'ऑपरेशन समुद्रगुप्त' असे नाव देण्यात आले आहे. जप्त केलेले औषध जलमार्गाने मोठ्या जहाजातून आणले जात होते. पाकिस्तान आणि इराणच्या सागरी सीमेजवळ एका जहाजात हे औषध भरले होते. नंतर छोट्या जहाजातून वेगवेगळ्या ठिकाणी उतरवले जाते. जप्त करण्यात आलेली औषधे 'खुशबू' आणि '५५५' अशा १३४ गोण्यांमध्ये पॅक करण्यात आली होती. सध्या एनसीबी हे शब्द किंवा नंबर पॅकिंग आहे की कुठला कोड आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
 
ड्रग्जचा मूळ स्त्रोत पाकिस्तान असल्याचे सांगितले जाते. त्याच्या रॅपरवर हाजी दाऊद अँड सन्स असे लिहिले आहे. जप्त करण्यात आलेल्या औषधांचे एकूण वजन अडीच टन आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी यंत्रणांकडून सुरू आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. एनसीबी आणि नौदलाला या कारवाईपूर्वी मालदीव आणि श्रीलंकेकडूनही इनपुट मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. भारतातील मेथॅम्फेटामाइनची ही सर्वात मोठी जप्ती असल्याचे सांगितले जात आहे. एनसीबीचे महासंचालक संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. डीआरआय गुजरात एटीएसही या मोहिमेत भागीदार होती.