'मोचा' चक्रिवादळ दुपारी धडकणार , मुसळधार पावसाची शक्यता!

    14-May-2023
Total Views |
Cyclone Mocha

नवी दिल्ली : 'मोचा' चक्रिवादळ हे १६० किमी प्रतितास आणि १८० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील अतितीव्र ‘मोचा’ चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारकडे झेपावत आहे. त्याच्या प्रभावाखाली आज पश्चिम बंगाल,ओडीशा, बांग्लादेश, आणि म्यानमारच्या किनाऱ्यावर अतिवृष्टी अपेक्षित आहे. भारतात त्रिपूरा , मिझोराम, नागालँड, अरूणाचल प्रदेश, आसाममध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच महाराष्ट्रात उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात उष्माघाताने ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान अतितीव्र चक्रीवादळ दि.१४ मे रोजी दुपारपर्यंत बांगलादेशाच्या कॉक्स बाजार आणि म्यानमारच्या 'क्याउक्प्यू' दरम्यान सिटवे जवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ किनारपट्टीलगत येताच या भागात प्रभावामुळे ताशी १७० ते २०० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.