सर्वोच्च न्यायालयाने नवा रस्ता दाखविला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    11-May-2023
Total Views |
fadanvis
 
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर निकाल दिला. निकालपत्राद्वारे सुप्रीम कोर्टाने तत्कालीन राज्यपालांवर ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयाच्या राज्यपालांच्या टिप्पणीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांबाबत काही टिप्पणी केली असली तरी राज्यपालांनी पुढे राबवलेल्या प्रक्रियेला नाकारलेले नाही. तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आमच्या सरकारला नवा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे राज्यात आमचे सरकार स्थिर राहणार यात कोणतीही शंका नाही.

दरम्यान सरकारने घटनात्मक ठरवलेल्या सरकारच्या पत्रकार परिषदेत आपले स्वागत, असं म्हणत फडणवीसांनी पत्रकारांना संबोधित केले. तसेच महाविकास आघाडीच्या मानसुब्यांवर पाणी फिरवत कोर्टाने ठाकरेंना मुख्यमंत्री बनवता येणार नाही हे स्पष्ट केले असून कोर्टाने काही महत्त्वाची निरीक्षण नोंदवली आहेत,असे फडणवीसांनी सांगितले. त्याचबरोबर अपात्रतेची सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले असून तेच यावर निर्णय घेणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.