मविआ नेत्यांनी जीभेवर संयम ठेवावा : विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवारांचा राऊत-पटोलेंवर निशाणा
10-May-2023
Total Views |
मुंबई : नाना पटोले यांनी चंद्रपूर बाजार समितीत स्थानिक पातळीवर भाजपसोबत हातमिळवणी केल्याने जिल्हाध्यक्ष देवराळ भोंगळे यांच्याविरोधात कारवाई केली. त्यामुळे देवराळ भोंगळे हे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या जवळचे नेते समजले जात असल्याने ते आक्रमक झाले. त्यानंतर "विजय वडेट्टीवार फार मोठे नेते नाहीत की मी त्यांच्यावर इथे प्रतिक्रिया द्यावी", अशी खोचक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.त्यावर मविआतील नेत्यांनी जीभेवर संयम ठेवावा , असा निशाणा विजय वडेट्टीवारांनी राऊत-पटोलेंवर साधलाय.
दरम्यान काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि नाना पटोलेंमधील वाद कायम असल्याचं आज पुन्हा एकदा दिसून आले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी काळात महाविकास आघाडीची एकजूट राहावी यासाठी आघाडीतील सर्वच नेत्यांनी जिभेवर संयम ठेवावा. त्याचबरोबर आघाडी मजबूत व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना अप्रत्यक्ष टोलाही विजय वडेट्टीवारांनी लगावला.