मुख्यमंत्री नितीश कुमार उद्या मुंबईत! पवार-ठाकरेंना भेटणार

    10-May-2023
Total Views |
bihar-cm-nitish-kumar-and-maharashtra-former-chief-minister-uddhav-thackeray-meeting-in-mumbai

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे ११ मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. विमानतळावरून ते थेट मातोश्रीवर जाऊन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच उद्धव ठाकरेंसोबत संयुक्त पत्रकार परिषदही घेण्याची शक्यता आहे. उद्धव यांची भेट घेतल्यानंतर ते शरद पवार यांच्या घरीही जाऊन भाजपविरोधात विरोधकांना एकत्र करण्याबाबत चर्चा नितीश कुमार करणार आहेत.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार मुंबईत येण्यापुर्वी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेणार आहेत.याआधी नितीश कुमार यांनी राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेत्यांची भेट घेतली आहे.