‘द काश्मीर फाईल्स’ किंवा ‘द केरला स्टोरी’चा उद्देश लोकांच्या मनात विष कालवणे आणि समाजात अशांतता निर्माण करणे हा नाही, तर समाजात जागृती निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला भीषण वास्तवाची जाणीव करून देणे आणि त्यानुसार वेळीच पावले उचलणे हा आहे.
अनेक राजकारणी, कम्युनिस्ट नेते आणि त्यांच्या समर्थकांनी मानवता आणि मानवी हक्कांना फार पूर्वीपासून फार महत्त्व दिलेले नाही. अशी मानसिकता ही स्वार्थी कारणांसाठी इतरांच्या नाशावर पोसते. या विषारी मानसिकतेने लहान मुले आणि महिलांसह असंख्य लोकांचे प्राण घेतले आहेत. वाईट म्हणजे, जे या अमानवी कृत्यांना प्रोत्साहन देतात आणि पोषण करतात, ते स्वतःला ‘मानवजातीचे रक्षक’ म्हणून सादर करतात. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याकांचे (हिंदू, जैन, शीख, बौद्ध आणि ख्रिश्चन) शोषण आणि जवळजवळ नामशेष होणे, जगभरात इस्लामिक राज्य शासन आणण्यासाठी ‘इसिस’ची निर्दयता, चीनमधील अल्पसंख्याकांचे शोषण हे काही विकृत मानवतावादी मुद्दे आहेत. चीनची कम्युनिस्ट पार्टी, उत्तर कोरियाची कम्युनिस्ट-आधारित हुकूमशाही, बोको हराम, धर्मांतराचे रॅकेट आणि अशा अनेक अमानवी कृत्ये जगाच्या मोठ्या भागात घडत आहेत.
या अमानवी कृत्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोण प्रायोजित करते? आर्थिक महाशक्ती अमेरिका, चिनी सरकार, काही युरोपीय देश आणि तुर्कस्तानसारख्या देशांनी वर्षानुवर्षे ते प्रायोजित केले नाही का? सर्वांत वाईट म्हणजे, हे देश भारतातील मानवी हक्कांवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत, जेथे अल्पसंख्याकांना न्याय्य वागणूक दिली जाते आणि बहुसंख्य हिंदूंचा जबरदस्त पाठिंबा आहे. परंतु, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक राजकारणी आणि कम्युनिस्ट अनुयायांच्या स्वार्थी, पैसा आणि सत्ताभिमुख अजेंडांमुळे मानवी हक्कांचे हनन झाले आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, दहशतवाद आणि संपूर्ण जगाला एका श्रद्धेमध्ये बदलू पाहणार्या विचारसरणीमुळे अशा मानसिकतेचे आणि कार्याचे परिणाम विनाशकारी आहेत. इस्लामिक दहशतवादी संघटनांमध्ये भरती आणि लैंगिक तस्करी ते भारताची लोकसंख्या बदलण्यापर्यंतच्या हेतूंसाठी कथित धर्मांतराच्या रणनीतीसाठी ’लव्ह जिहाद’ची कृती अधिक प्रमाणात वापरली जात आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ किंवा ‘द केरला स्टोरी’चा उद्देश लोकांच्या मनात विष कालवणे आणि समाजात अशांतता निर्माण करणे हा नाही, तर समाजात जागृती निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला भीषण वास्तवाची जाणीव करून देणे आणि त्यानुसार वेळीच पावले उचलणे हा आहे. दहशतवादाचा हा प्रकार जगाच्या कानाकोपर्यात आपले पंख पसरवत आहे. चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाबद्दल आम्ही उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांचे आभारी आहोत. याकडे केवळ धार्मिक समस्या म्हणून पाहू नये, तर विशिष्ट राजकीय वर्ग, धर्मांतर माफिया आणि साम्यवादाच्या अनेक अनुयायांनी मानवतेवर केलेला हल्ला म्हणून याकडे पाहिले पाहिजे.
कम्युनिस्टांनी ‘द केरला स्टोरी’ नक्कीच पाहावी आणि गीतांजली नावाच्या मुलीचे भावनिक आव्हान समजून घ्यावे, तिने तिच्या कम्युनिस्ट पालकांना प्रश्न केला की, तिला सनातन धर्म, वेगवेगळे सण, उत्सव आणि सांस्कृतिक परंपरांबद्दल का शिकवले नाही, हे तिने तेव्हा विचारले जेव्हा तिला ‘लव्ह जिहाद’ सापळ्याची जाणीव झाली, ज्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. कम्युनिस्टांनी धर्म आणि ‘रिलीजन’मधील भेद ओळखला पाहिजे. आपण सर्वांचा आदर केला पाहिजे. परंतु, सनातन धर्माची तत्त्वे मुलांमध्ये रुजवली पाहिजेत, जेणेकरून ते वेगवेगळ्या देवाच्या नावाने फसले जाऊ नयेत आणि त्यांनी जीवन नष्ट करून घेऊ नयेत. हिंदुत्व किंवा सनातन हा एक धर्म आहे, ‘रिलीजन’ नाही, जो लोकांना कधीही एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करण्यास भाग पाडत नाही आणि अगदी नास्तिकांनादेखील पूर्णपणे स्वीकारतो.
याउलट, काही ‘रिलीजन्स’चा असा विश्वास आहे की, त्यांचा मार्ग हा एकमेव मार्ग आहे आणि प्रत्येकाने त्याचे अनुसरण केले पाहिजे नाही, तर त्यांच्या देवाकडून शिक्षा भोगावी लागेल. या धर्मातील तज्ज्ञांनी सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या समुदायांना विविधता, संस्कृती आणि परंपरांचा आदर करण्यास शिकवले तरच खरी शांतता नांदेल. सनातन धर्माचे विरोधक हे प्रस्थापित करू शकतात की, भारताने कोणत्याही देशाला लक्ष्य केले आणि जमीन, संसाधने ताब्यात घेतली, संस्कृती आणि पूजास्थळे नष्ट केली, धर्म परिवर्तन केले आणि अफाट संपत्ती लुटली? तथापि, हे आपल्या भव्य राष्ट्रासोबत अनेक शतकांपासून घडत आले आहे आणि सनातनच्या अनुयायांनी कधीही काहीही हडप करण्याचा किंवा लुटण्याचा सूड घेतला नाही. तथापि, अनेक राजकीय नेते आणि कम्युनिस्टांनी द्वेषातून सनातन धर्माला लक्ष्य करणे सुरूच ठेवले आणि काश्मीर, केरळ किंवा इतर भागात आपण जे काही अनुभवत आहोत, ते या मानसिकतेचा परिणाम आहे.
मानवाधिकार आयोग, न्यायपालिका आणि अमेरिका, काही युरोपीय राष्ट्रे आणि चीनमधील नागरिकांनी त्यांच्या सरकारांना प्रश्न केला पाहिजे की, ते आपल्याच देशात मानवाधिकार तत्त्वे का पाळत नाहीत? त्याचवेळी असामाजिक घटकांना शस्त्रे आणि दारूगोळा देऊन, मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि लष्करी तरतूद करून इतर देशांचा नाश का करू पाहत आहेत? भारतातील मानवी हक्कांवर प्रश्नचिन्ह उभे करताना अमेरिकन प्रशासन आपल्या देशातील कृष्णधवल भेदभाव व अत्याचार कसे विसरते? सनातन धर्माचे कट्टर अनुयायी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्यांनी युद्धग्रस्त सीरिया, येमेन आणि सुदानमधील हजारो निर्वासितांना त्यांचा धर्म आणि देश न पाहता वाचवले आहे, हेच मानवतेचे सार आहे. ज्याचे संपूर्ण जगाने अनुसरण केले पाहिजे व सनातन धर्माबद्दल द्वेष सोडून खोलवर अभ्यास केला पाहिजे.
आपल्या बंधू-भगिनींविरुद्ध होणार्या गुन्ह्यांबाबत आपण गप्प राहिलो, तर अफगाणिस्तान, काश्मीर आणि केरळ हे हिमनगाचे फक्त टोक आहे; नजीकच्या भविष्यात, मानवतेचा संपूर्णपणे नाश होईल आणि दहशतवादी जगावर राज्य करतील. अनेक भारतीय राजकारणी, कम्युनिस्ट आणि परकीय निधी मिळविलेल्या कार्यकर्त्यांनी हे ओळखले पाहिजे की, सत्ता मिळवणे आणि कोणत्याही मार्गाने संपत्ती जमा करणे, हे त्यांचे अल्पकालीन उद्दिष्ट त्यांच्या भावी पिढ्यांचा नाश करेल. जर त्यांनी असामाजिक तत्वांना पाठिंबा देणे सुरूच ठेवले आणि सनातन धर्माबद्दल तीव्र द्वेष बाळगतच राहिलात तर, अशा प्रकारच्या विचारसरणीमुळे आणि वैमनस्यामुळे, आपल्या पूर्वजांनी संस्कृती, पैसा आणि संसाधने गमावली, तसेच गुलाम मानसिकता विकसित होण्यामागे आधीच मोठी किंमत मोजली आहे.
जबाबदार नागरिक म्हणून, आपण खालील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अनुसरण केले पाहिजे आणि लागू केले पाहिजे-
१. तरुणांना सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा शिकवा आणि आचरणात आणा आणि या क्रियाकलाप आणि उपासनेला आधार देणारी वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि जगाच कल्याण करण्याची वृत्ती समजून घेण्यास त्यांना मदत करा.
२. शक्य तितक्या लवकर शालेय अभ्यासक्रमात रामायण, महाभारत आणि भगवद्गीता समाविष्ट करण्यासाठी सरकारवर दबाव आणा.
३. ‘श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला विरोध करणार्या कोणत्याही राजकीय पक्षाला, गैर सरकारी संस्था किंवा इतर सामाजिक संस्थेला पाठिंबा देऊ नका.
४. तुमच्या मुलांमध्ये महान संस्कृतीचे अनुसरण करणारे ‘राष्ट्र प्रथम’ आणि स्वत:ला शेवटचे हे मूल्य बिंबवा.
धर्मानुसार मानवजातीचा विजय होऊ दे आणि दहशतवाद आणि कट्टरता नाहीशी होऊ दे!
७८७५२१२१६१