नवी दिल्ली : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) गो फर्स्ट या विमान कंपनीची दिवाळखोरीची याचिका स्विकारली आहे. यामुळे आता विमान कंपनीस वसुलीतून दिलासा मिळाला आहे.
एनसीएलटीचे अध्यक्ष अध्यक्ष न्यायमूर्ती रामलिंगम सुधाकर आणि न्या. एल. एन. गुप्ता यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने कर्जबाजारी कंपनी चालवण्यासाठी अभिलाष लाल यांची अंतरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल (आयआरपी) म्हणून नियुक्ती केली आहे. खंडपीठाने कंपनीला स्थगितीच्या संरक्षणाखाली ठेवले आणि निलंबित संचालक मंडळाला त्वरित खर्चासाठी ५ कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
कंपनी चालू ठेवण्यासोबतच एनसीएलटीने कोणत्याही कर्मचाऱ्याची छाटणी होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. एनसीएलटीने ४ मे रोजी वाडिया समूहाच्या मालकीच्या या कंपनीच्या दिवाळखोरी अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर आपला आदेश राखून ठेवला होता.