नवी मुंबईतील मालमत्ता प्रदर्शनाचे लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

100 पेक्षा अधिक बांधकाम व्यवसायिकांचा सहभाग

    08-Apr-2023
Total Views |
21st Credai BANM Real Estate Exhibition

नवी मुंबई : २१ व्या क्रेडाई बीएएनएम रिअल इस्टेट प्रदर्शनाचे लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी क्रेडाई बीएएनएम चे अध्यक्ष वसंत बद्रा , संघटनेचे अन्य पदाधिकारी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनात १०० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग घेतला असून त्यांनी आपले प्रकल्प नवी मुंबईतील विविध नोड्समधील लोकांसमोर ठेवले आहेत. या उद्घाटन सोहळ्याला पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, उरणचे आमदार महेश बाल्दी यांच्यासह क्रेडाई बीएएनएमचे सदस्य आणि बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. उद्घाटनानंतर लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्या स्टॉल्सना भेट दिली. प्रसंगी लोकनेते नाईक यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले की शहराच्या प्रगतीबरोबर शहर निर्मात्यांचीही प्रगती होईल.

लोकनेते नाईक यांच्या नेतृत्वाखाली आसपासचे नोडही विकसित होत आहेत - आमदार महेश बालदी

नवी मुंबई शहराच्या उभारणीत बिल्डरांसोबतच आमदार गणेश नाईक यांचाही मोठा हात आहे. आणि त्याच्या नेतृत्वाखाली उर्वरित नोड्स देखील विकसित होत आहेत. नवी मुंबईतील द्रोणागोरी पुष्पक परिसराचा विकास करण्यासाठी आमदार गणेश नाईक बिल्डर आणि सरकार यांच्यातील दुवा ठरतील.
 
पनवेल महापालिका नवी मुंबईच्या पावलावर पाऊल ठेवते आहे - आयुक्त गणेश देशमुख
 
राजकीय व्यवस्थेच्या म्हणजेच स्थानिक राजकारण्यांच्या सहकार्याशिवाय कोणत्याही शहराचा विकास शक्य नाही. यापुढे पनवेलही नवी मुंबईच्या पावलावर पाऊल टाकेल आणि लवकरच पनवेलचाही नवी मुंबईसारखा विकास होईल, असेपनवेल आयुक्त गणेश देशमुख म्हणाले.