नवी दिल्ली : फोर्ब्सने नुकतेच अब्जाधीशांची यादी जाहिर केली आहे. या अब्जाधीशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत भारताचाही समावेश असून भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीनुसार, देशातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती $६७५ अब्ज आहे. तरी २०२२ च्या तुलनेत ७५ अब्ज डॉलर कमी संपत्ती आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या लिस्ट २०२३ नुसार भारतात १६ नवीन अब्जाधीश आहेत.
एकूण अब्जाधीशांची संख्या : २६४०
अमेरीका : ७३५
भारत : १६९
जर्मनी : १२६
रशिया : १०५
हाँगकाँग : ६६
इटली : ६४
कॅनडा : ६३
युके : ५२
फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत अब्जाधीश झालेल्या नवीन अब्जाधीशांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. यामध्ये पहिले नाव आहे रोहिका सायरस मिस्त्री, दिवंगत उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या पत्नी आणि पालोनजी शापूरजी मिस्त्री यांच्या सून. ज्यांची एकूण संपत्ती ७ अब्ज डॉलर्स आहे. या यादीत दुसरे नाव आहे राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला. रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे $ ५.१ अब्ज आहे. तिसऱ्या क्रमांकावर APL अपोलो ट्यूब्सच्या सह-संस्थापक सरोज राणी आहेत. सरोज राणी यांची एकूण संपत्ती $१.२ अब्ज आहे.
याशिवाय ब्रोकिंग फर्म Zerodha चे सह-संस्थापक निखिल कामथ यांचे नाव भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून या यादीत समाविष्ट आहे. निखिलची एकूण संपत्ती $ १.१ अब्ज आहे. निखिलचा मोठा भाऊ नितीन कामथ यांचे ही या यादीत समावेश आहे. नितीनची एकूण संपत्ती २.७ अब्ज डॉलर आहे. तसेच गौतम अदानी यांचा भाऊ विनोद अदानी यांचाही या यादीत समावेश आहे .ज्याची एकूण संपत्ती $ १० अब्ज आहे. अब्जाधीशांच्या या यादीत उद्योगपती केशब महिंद्रा यांचेही नाव समाविष्ट करण्यात आले आहे. केशब महिंद्राची एकूण संपत्ती $१.२ अब्ज आहे.
पंरतू तरी देखील संपूर्ण जगात अब्जाधीशांची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षी अब्जाधीशांच्या यादीत २६६८ नावांचा समावेश होता. त्याच वेळी, या वेळी जगात २८ अब्जाधीश कमी झाले आहेत. आता अब्जाधीशांची संख्या २६४० वर आली आहे.