भारत – श्रीलंका सागरी सरावास गुरूवारपासून प्रारंभ

भारत - श्रीलंका यांच्यातील दहावा द्विपक्षीय सागरी सराव, कोलंबो येथे 3 ते 8 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित केला आहे

    05-Apr-2023
Total Views |
/india-sri-lanka-maritime-exercise-slinex-2023-begins-in-colombo

नवी दिल्ली
: भारत - श्रीलंका यांच्यातील दहावा द्विपक्षीय सागरी सराव (स्लिनेक्स -23) कोलंबो येथे 3 ते 8 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित केला आहे. हा सराव दोन टप्प्यात आयोजित केला जात आहे. सरावाचा हार्बर टप्पा 3-5 एप्रिल 2023 आणि सागरी 6 -8 एप्रिल 2023 होणार आहे.

स्वदेशी कमोर्टा वर्गातील एएसडब्ल्यू कॉर्वेट आयएनएस किल्तान आणि आंतरराष्ट्रीय गस्ती नौका आयएनएस सावित्री भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व करत आहे. श्रीलंकेच्या नौदलाचे प्रतिनिधित्व एसएलएनएस गजबाहू आणि एसएलएनएस सागरा करत आहेत. सागरी गस्ती विमाने, हेलिकॉप्टर आणि दोन्ही बाजूंचे विशेष दलही या सरावात सहभागी होणार आहेत. याआधीचा स्लिनेक्स सराव 7-12 मार्च 2022 दरम्यान विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला होता.

संयुक्तपणे बहुआयामी सागरी सरावाच्या माध्यमातून आंतरकार्यक्षमता वाढवणे, परस्परांना जाणून घेणे आणि सर्वोत्कृष्ट पद्धतींची देवाणघेवाण करणे हे स्लिनेक्सचे उद्दिष्ट आहे. दोन्ही नौदलांमधील मैत्री आणि सौहार्दाचे बंध अधिक दृढ करण्यासाठी हार्बर टप्प्यात व्यावसायिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रम तसेच सामाजिक देवाणघेवाण करण्याचे नियोजनही केले आहे.