मविआच्या सभेला नाना पटोले अनुपस्थित का? उत्तर देताना राऊतांची तारांबळ
03-Apr-2023
Total Views |
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने 'सावरकर गौरव यात्रा' काढणार असल्याचे सांगितले. यावर मविआ ने सभा बोलावली होती. मात्र, या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. मविआने प्रकृती स्थिर नसल्याचे कारण दिले. तर, संजय राऊतांची यावर उत्तर देताना तारांबळ पाहायला मिळाली.
राऊत म्हणाले, "कालची सभा उत्तम पार पडली. नाना पटोले आजारी होते. काल दिवसभर ते झोपून होते. त्यामुळे ते सभेला येउ शकले नाही. मात्र पुढच्या सभेला ते नक्की हजर असतील." मात्र, नाना पटोले यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, "माझी तब्येत चांगली आहे, माझ्यामुळे इतरांची तब्येत खराब होईल." पटोलेंनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.